गुन्हा वापस घ्या अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करेल-सारिका ताई शिरसागर

गुन्हा वापस घ्या अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करेल-सारिका ताई शिरसागर
बीड/वार्ताहर
काल झालेल्या गोळीबार प्रकरणात डॉक्टर भारत भूषण शिरसागर यांचा कसलाही संबंध नसताना व योगेश भैय्या क्षीरसागर यांचाही या प्रकरणात काहीच संबंध नव्हता तरी देखील यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आलं या दोघांनी जर धमकी दिली असेल तर त्याचे पुरावे दाखवावे जर पुरावे नसतील तर गुन्हा वापस घ्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सारिका ताई यांनी दिला आहे.
रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबारप्रकरणात डॉ . भारतभूषण क्षीरसागर व इतरांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत यासाठी शनिवारी शिवसेना आक्रमक झाली . डॉ . सारिका क्षीरसागर यांच्यासह सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बीडमध्ये पायी आंदोलन करत जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे . बीड शहराचे माजी नगराध्यक्ष डॉ . भारतभूषण क्षीरसागर आणि इतरांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . पोलीसांनी कोणतीही खातरजमा न करता गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावेत अशी मागणी डॉ . सारिका क्षीरसागर , अनिल जगताप , सचिन मुळूक , बाळासाहेब पिंगळे , विलास विधाते , गणपत डोईफोडे , महेश धांडे आदिंनी केली आहे .








