रवींद्र क्षीरसागर , हेमंत क्षीरसागर , अर्जुन क्षीरसागर आदींसह आठजनावर गुन्हा दाखल

रवींद्र क्षीरसागर , हेमंत क्षीरसागर , अर्जुन क्षीरसागर आदींसह आठजनावर गुन्हा दाखल
बीड/वार्ताहर
काल शहरात झालेल्या गोळीबार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिभा श्रीराम क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे रजिस्ट्री कार्यालयात रजिस्ट्रीसाठी आलेल्याना धारदार शस्त्राचा धाक दाखवून पैशाची बॅग लंपास करत हल्ला केल्याप्रकरणी रवींद्र क्षीरसागर , हेमंत क्षीरसागर , अर्जुन क्षीरसागर आदींसह आठजनावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दरोड्याचा शनिवारी ( दि . 26 ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे . प्रतिभा श्रीराम क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून आरोपींनी चाकूचा धाक दाखवून हल्ला केला . जवळ असलेली लाखो रुपयांची बॅग घेऊन जाऊन फिर्यादीस जिवे मारण्याचा उद्देशाने हल्ला केला . या प्रकरणी रवींद्र क्षीरसागर , हेमंत क्षीरसागर , अर्जुन क्षीरसागर , सिद्दीकी फारुकी , गणेश भरनाळे , यांच्यासह आठ जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कलम 307 , 395 , 147 , 148 , 149 सह भादवि भारतीय हत्त्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . प्रकरणाचा प्राथमिक तपास उपनिरीक्षक बाळराजे दराडे हे करत आहेत .








