महिलांच्या खरेदीसाठी महिलांचा हक्काचा मॉल

महिलांच्या खरेदीसाठी महिलांचा हक्काचा मॉल
बीड/प्रतिनिधी
शहरातील पहिल्यांदाच महिलांच्या खरेदीसाठी स्वतंत्र व्यवस्था करून महिला मॉल ची व्यवस्था शहरातील भाजी मंडई येथे अहिल्याबाई होळकर सभागृहात पंचेचाळीस दुकाने उभारून महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आली आहे या मॉलमध्ये महिलांच्या वेगवेगळ्या वस्तू,महिलांच्या दररोज उपयोगात येणाऱ्या वस्तू मॉलच्या दुकानात स्वस्त दरात ठेवण्यात आल्या आहेत. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे विक्री आणि प्रदर्शन व गृहोपयोगी वस्तू देखील या दुकानांमध्ये ठेवण्यात आले आहेत.कॉस्मेटिक, लेडीज वेयर,ज्वेलरी ,महिलांसाठी कमी दरामध्ये ब्युटी पार्लरची व्यवस्था आहे.बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या लहान मुलांसाठी खेळण्या ठेवण्यात आल्या आहेत.त्याचबरोबर शेंद्रीय खतापासुन तयार केलेल्या विविध प्रकारचे धान्य, कडधान्य देखील माॅलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. सोलापूर पद्धतीच्या चटणी व भाकरी देखील या मॉलमध्ये विक्रीस उपलब्ध आहेत तसेच सर्व पुजेचे साहित्य व धार्मिक पुस्तके देखील विक्रीस उपलब्ध आहेत.या माॅल मध्ये महापुरुषांचे फोटो फ्रेम व लॅमिनेशन देखील आहेत.तसेच हाताने तयार केलेल्या शेवई,पापडी,कुरडई,पापड व तिळापासुन तयार केलेल्या पापड्या देखील विक्रीस आहेत.सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तु देखील स्वस्त दरात मिळतील. विविध प्रकारचे खाद्या तेल देखील उपलब्ध आहेत.तसेच या माॅल मध्ये काष्टा साडी रेडीमेड व तयार करून देखील मिळेल.तसेच आलेल्या महिलांना पीण्यासाठी शीतपेय यामध्ये उसाचा रस,जुस,लस्सी,आईस्क्रीम,कोल्ड कॉफी,विक्री देखील केली जाणार आहे.लहान मुलांपासून ते वयोवृद्धा पर्यंत डायपर,सॅनिटरी नॅपकीन देखील विक्रीस उपलब्ध आहेत. या मॉलचे वैशिष्ट्य म्हणजे या मॉलमध्ये प्रत्येक दुकानावर विक्रीस महिलाच करत आहेत.यामुळे या महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी बीड शहरातील नागरिकांनी व महिलांनी बचत गट मॉलमध्ये एकवेळेस आवश्य भेट द्यावी ही महिला व्यापाऱ्यांकडून मागणी होत आहे.
