शहरातील गोळीबार दोन जन जखमी

शहरातील गोळीबार दोन जन जखमी
बीड/वार्ताहर
शहरातील गोळीबार झाल्याने शहर हादरल्या चे प्रकार पाहण्यास मिळत असून बीड जिल्हाधिकारी कार्यालय शेजारीच ही गोळीबार झाल्याने जास्तच खडबड झाली आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की , शुक्रवारी सकाळी ११ ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान गोळीबाराची घटना घडली . यामध्ये सतिश बबन क्षीरसागर ( वय ३० ) रा . लक्ष्मी नगर आणि फारूख सिद्दीकी ( वय २८ ) हे दोघेजण जखमी झाले . सतिश क्षीरसागर याच्या पायात गोळी लागली असून त्याला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याच्या पायामध्ये गोळी असल्याचे एक्सरेमध्ये दिसून आले . तर फारूख सिद्दीकी याच्या गाला जवळून गोळी चाटून गेली असून त्याच्या डोक्यात आणि तोंडावर लाकडी दांड्याचा मार असल्याने तोही गंभीर जखमी आहे . दोन्हीही जखमींना अधिक उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आले . दरम्यान या गोळीबाराची वार्ता शहरात पसरल्यानंतर मोठी खळबळ उडाली . पोलीस अधिक्षक आर . राजा , अप्पर पोलीस अधिक्षक सुनील लांजेवार , सहाय्यक पोलीस अधिक्षक रश्मी राव , पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके , शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड , उपनिरीक्षक मीना तुपे आदींनी घटनास्थळी धाव घेतली तर सीआरपीएफचे जवानही रजिस्ट्री कार्यालय परिसरात तैनात करण्यात आले . यावेळी पोलीस अधिक्षकांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केले असल्याचे सांगितले . दोन्हीही जखमी औरंगाबादला उपचाराकामी गेल्यामुळे या प्रकरणाची तक्रार दाखल होण्यास वेळ लागत आहे .








