नाचून नव्हे तर वाचून शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

नाचून नव्हे तर वाचून शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा
शिवसंग्रामचे प्रशांत डोरले सोबतच युवकांच्या वतीने प्रभाग क्रमांक ८ मध्ये अनोखा उपक्रम.
बीड/प्रतिनिधी
अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड हिंदुस्थानात मोठ्या उत्साहात पार पडत असताना हि बीड शहरात शिवसंग्रामचे संस्थापक मा. आ. विनायकरावजी मेटे साहेब यांच्या आदेशानुसार बीड शहरभरात शिवजन्मोत्सव सामाजिक उपक्रमाने साजरा होत आहेत, यात शिवपूजन करत शिवप्रसादाचे वाटप सोबतच निराधार लोकांना जिव्हाळा बेघर येथे अन्नदानासारखे अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत.
आ.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या संकल्पनेतून छत्रपती श्री शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन मिरवनापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन ज्या पद्धतीने महाराजांनी अठरापगड जातील सोबत घेत रयतेचे हिँदवी स्वराज्य स्थापन केले म्हणून शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानच्या रयतेचे छत्रपती झाले, परंतु आज त्यांचा व सर्वच महापुरुषांचा खरा इतिहास कुठे तरी लपवला जात आहे, म्हणून आज बीड शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये शिवसंग्रामचे युवक शहराध्यक्ष प्रशांत डोरले यांच्या वतीने शिवचरित्र, महापुरुषांचे साहित्य, संत महात्म्यांचे वाङ्मय, युवक व नवउद्द्योजकांना उपयोगी असणारे प्रेरणादायी अश्या ३९२ विविध पुस्तकांचे घरोघरी वाटप करत अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष शिवसंग्रामचे युवक नेते रामहरी भैय्या मेटे हे उपस्थित होते भागातील जेष्ठ सिक्करवार साहेब, दिलीपसिंह ठाकूर सर, बनसोडे साहेब, मुकुंद गोरे, सातिराम ढोले, शेषेराव तांबे हे होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दर्शन पागोटे, सागर पिल्ले, अक्षय डोंगरे, राज पिल्ले, ओंकार सिक्करवार, अक्षय वाघमारे, ज्ञानेश्वर सालपे, ईश्वर काशीद यांनी मेहनत घेतली यावेळी अनिकेत देशपांडे, राहुल अण्णा गायकवाड, परशुराम गायकवाड, प्रकाश जाधव, सलीम पठाण, अक्षय जाधव, विशाल काळे, रोहित बागलाने, हरिश्चंद्र ठोसर, विष्णुबाल झोडगे, शरद झोडगे, सह अन्य शिवप्रेमी उपस्तिथ होते.
