शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय शेजारीच गोळीबार दोन जन जखमी !

शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय शेजारीच गोळीबार दोन जन जखमी !
बीड/वार्ताहर
शहरातील गोळीबार झाल्याने शहर हादरल्या चे प्रकार पाहण्यास मिळत असून बीड जिल्हाधिकारी कार्यालय शेजारीच ही गोळीबार झाल्याने जास्तच खळबळ झाली आहे. बीड येथील रजिस्ट्री कार्यालयात आज ( दि . २५ ) सकाळी ११ च्या सुमारास गोळीबार झाल्याची माहिती असून यात दोघे जखमी झाले आहेत . बीडच्या जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत . सतीश क्षीरसागर आणि फारुक सिद्दीकी अशी जखमींची नावे आहेत . बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते . यात सतीश क्षीरसागर याच्या पायाला गोळी लागली असून फारुकी सिद्दीकच्या पायाला गोळी चाटून गेली असल्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळाली आहे तर हा प्रकार जमिनीच्या वादातून झाल्याचे सांगितले जात असून अधिक माहिती लवकरच मिळेल .








