केज रोडवर भीषण अपघातात एक जागीच ठार

केज रोडवर भीषण अपघातात एक जागीच ठार
केज / वार्ताहार
अंबाजोगाई रोडवर उपजिल्हा रुग्णालय केज पासून सुमारे २०० मीटर अंतरावर मोटार सायकल व टेम्पोचा अपघात होऊन त्यात मोटारसायकलस्वार जागीच गतप्राण झाला . रात्री ९ : ३० वा . केज- अंबाजोगाई रोडवर उपजिल्हा रुग्णालय केज पासून सुमारे २०० मिटर अंतरावर तांबवेश्वर फर्निचर या दुकाना समोर अंबाजोगाई कडून बीडच्या दिशेने जाणाऱ्या एका भंगराच्या टेम्पो क्र . ( एम एच २३ / एयु - २२ ९ ० ) आणि केज कडून अंबाजोगाईच्या दिशेने जाणाऱ्या मोटार सायकल क्र . ( एमएच -४४ / आर -१७७४ ) या दोन वाहनांचा भीषण अपघात झाला . अपघातात मोटार सायकस्वार संताराम कावळे , वय ( ४५ वर्ष ) रा . परळी याच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला . अपघाताची माहिती पत्रकार गौतम बचुटे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मिसळे यांना दिली . माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशावरून पोलीस नाईक उमेश आघाव , मंगेश भोले , अशोक गवळी , हनुमंत गायकवाड हे अपघाताच्या घटनास्थळी हजर झाले . त्या नंतर प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविले आहे .








