हाफीजअशफाक यांनी विशेष प्रयत्नातून करून घेतले अरिष मस्जिद गल्ली येथील सिमेंट रस्ता
Beed

हाफीजअशफाक यांनी विशेष प्रयत्नातून करून घेतले अरिष मस्जिद गल्ली येथील सिमेंट रस्ता
बीड/वार्ताहर
गेल्या अनेक दिवसापासून च्या प्रतीक्षेनंतर अनेक निवेदने आंदोलने पाठपुरावा आणि कठोर मेहनत घेतल्या नंतर नगरसेविका पुत्र हाफीज अशफाक यांच्या मेहनतीचे चीज झाले आहे,
आज अनेक दिवसांच्या पाठपुरावा आणि नगरसेवक फंडातून हाफीज अशफाक यांनी प्रभाग क्रमांक एकवीस येथील अरिश मस्जिद गल्ली येथील सिमेंट रस्ता पूर्णतः करून घेतला या भागातील नागरिकांची ही अनेक वर्षापासून मागणी होती की हा रस्ता करून दिला पाहिजे,
परंतु सत्ता धारी लोकांनी वेळोवेळी या कडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला आंदोलन,निवेदन आणि पाठपुरव्यानंतर हे यश आपल्या पदरात पाडून घ्यावे लागले म्हणूनच नागरिकांच्या प्रतिक्रिया ही समाधान कारक मिळतं आहेत








