दुय्यम सेवा पूर्व परिक्षेसाठी परिक्षा केंद्राची नावे जाहिर

Beed

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या

दुय्यम सेवा पूर्व परिक्षेसाठी परिक्षा केंद्राची नावे जाहिर

 बीड/वार्ताहर 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यमसेवा (पूर्व) परीक्षा  दि.26 फेब्रुवारी 2022 रोजी बीड जिल्हा एकूण 21 उपकेंद्रामधून  घेण्यात येणार आहे. परिक्षा केंद्राचे नाव व विद्यार्थी संख्या पुढीलप्रमाणे आहेत. चंपावती माध्यमिक विद्यालय, नगर रोड (480), चंपावती इंग्लिश स्कुल नगर रोड (264), चंपावती प्राथमिक  विद्यालय नगर रोड (264), शिवाजी विद्यालय, कनॉल रोड (384), सौ. के. एस. के महाविद्यालय, शिवाजी नगर (264), संस्कार विद्यालय, नवीन भाजी मंडई (432), स्वा वीर सावरकर माध्यमिक विद्यालय, सराफा लाईन (312), व्दारकादास मंत्री राजस्थान विद्यालय, विप्र नगर रोड (336), गीता कन्या प्रशाला, सुभाष रोड (240), मिल्लीया मुलींचे विद्यालय, किल्ला मैदान (360), मिल्लीया मुलांचे ज्य. व सिनियर विद्यालय (288), सेन्ट ऑन्स इंग्लिश स्कुल, जालना रोड (240), गुरुकुल इंग्लिश स्कुल, जालना रोड (360), श्री छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालय, शहू नगर (240), बंकट स्वामी महाविद्याल, शाहू नगर (240), द. बा. घुमरे पब्लिक स्कूल, मुक्ता लॉन्स जवळ (240), एम. एस. पी. लॉ कॉलेज, बार्शी रोड (288), गव्हरमेन्ट पॉलिटेकनिक कॉलेज,खंडेश्वरी, नाथापूर रोड (240), भगवान विद्यालय, धानोरा रोड (480), डॉ. बापूजी सांळूखे माध्यमिक विद्यालय व डिएड कॉलेज (240) आणि  बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, किल्ला मैदान (456) या परीक्षेसाठी एकूण 6648 उमेदवार बसलेले असून, परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौ.प्र.सं.1973 चे कलम 144 (1)(3)अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे. असे, आदेश उपविभागीय दंडाधिकारी नामदेव टिळेकर यांनी दिले आहेत.

 

 

Sharing

Visitor Counter