केंद्र सरकार तपास यंत्रेचा गैरवापर करुन लोकशाहीचा गळा आवडत आहे -प्रा. इलियास इनामदार

केंद्र सरकार तपास यंत्रेचा गैरवापर करुन लोकशाहीचा गळा आवडत आहे -प्रा. इलियास इनामदार
बीड/प्रतिनिधी
कैबिनेट मंत्री नवाब मलिक यांची सुडबुद्धिने केलेल्या कार्यवाही व अटकेचा लोकसेना संघटना जाहिर निषेध करत असून केंद्र सरकार तपास यंत्रेचा गैरवापर करुन लोकशाहीचा गळा आवडत आहे असा आरोप भाजपावर लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी केला आहे. केंद्रातील भाजपा सरकारने देशात हाहाकार माजावला आहे सत्तेचा गैरवापर करुन कोणतेही बेताल व तुघलकी निर्णय घेत आहे देशातील तपास यंत्रणा, स्वायत्त संस्था, काही मीडिया चैनल, काही प्रशासकीय अधिकारी सगळे भाजपा सरकारच्या इशा-यावर नाचत आहे असे आपल्याला दिसत आहे कोणत्याही सामाजिक धार्मिक प्रकरणात कोर्टावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सरकारकडून व त्याच्या बगलबच्चयाकडून होताना दिसत आहे सरकारच्या एखाद्या निर्णयाचा विरोध इतर पक्षाच्या नेत्यांनी केला की त्याला तपास यंत्रेला समोरे जावे लागत आहे नाही तर जेलमध्ये डांबण्यात येत आहे देशात लोकशाही राज्य आहे का हुकूमशाही राज्य हेच कळत नाही काही दिवसापूर्वी राज्याचे कैबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी समीर वानखेड़े यांच्या फर्जी जातीचे प्रमाणपत्राची पोलखोल केली होती त्यामुळे इड़ीचे प्रवक्ते सोमय्या यांनी भविष्यवाणी करुन अगोदरच सांगितले होते की नवाब मलिक यांच्यावर इड़ीची कार्यवाही होणार म्हणजे याचा अर्थ काय देशमुखवर कार्यवाही होणार, मलिकवर कार्यवाही होणार, परबवर कार्यवाही होणार, संजय राऊतवर कार्यवाही होणार म्हणजे हे भाजपाचे सोमय्या खासदार आहे का इड़ीचे प्रवक्ते आहे हेच कळत नाही मग असे तर नाही ना की केंद्र सरकार आपल्या विरोधाकावर राग उगवण्यासाठी तपास यंत्राचा वापर करत आहे जर असे असेल तर देश नरेन्द मोदी, अमित शाह व भाजपाला कधी माफ करणार नाही आणि भाजपाप्रेमी जनतेला सांगू इच्छीतो आज आम्ही जनता म्हणून शांत बसलो आणि उद्या कांग्रेसची सरकार आली आणि त्याने पण हेच हथकंडे वापरले तर त्याचा पण आपण विरोध करू पण तो पर्यंत खुप उशीर होईल कारण कोणत्याच पक्षाने अशा करवाया करणे उचित नाही आज देशाचा भाजपामुळे खुप नुकसान झाला महगाई, बेरोजगारी, शेतकरी-कामगार प्रश्न,धार्मिक उन्माद, खाजगीकरण, एकतरफा तुगलकी फरमानामुळे देश डबघाईला आला आहे जनतेचा लक्ष विचलित करण्यासाठी सरकार तपास यंत्रना व धार्मिक उन्मादासारखे नवे नवे प्रयोग करत आहे अशा मानसिकतेचा लोकसेना संघटना जाहिर निषेध करते व लोकहित-देशहितमध्ये जनतेने विरोध करणे गरजेचे आहे अशी विनंती लोकांना लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी केली आहे.








