पोलीस अधिक्षक कार्यलयात एचआयव्ही/एड्स संवेदिकरण कार्यशाळा संपन्न

पोलीस अधिक्षक कार्यलयात एचआयव्ही/एड्स संवेदिकरण कार्यशाळा संपन्न
बीड/वार्ताहर
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार व मा.जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय बीड मार्फत दिनांक 22.02.2022 रोजीपोलीस अधिक्षक कार्यालय बीड येथे सकाळच्या सत्रात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी तर सायंकाळच्या सत्रात राखीव सुरक्षा बल जवान यांच्या करिता दोन वेगवेगळ्या सत्रामध्ये एचआयव्ही एड्स संवेदिकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस उपअधिक्षक (गृह) श्री.श्रीपाद मुकुंद परोपकारी तर प्रमुख पाहुणे म्हणुन रश्मीता राव (IPS) या होत्या तर सायंकाळच्या सत्राचे अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक श्री.संतोष पाटील हे होते.
सदरिल कार्यशाळेचे प्रास्तावीक जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती साधना गंगावणे यांनी केले. प्रस्तावीकामध्ये कार्यशाळा आयोजना मागचा उद्देश, जिल्ह्यातील एचआयव्ही/एड्स सेवा सुविधा इत्यादी बाबत माहिती देऊन निनिराळ्या लक्ष्यघटकांमध्ये विविध आयसीटीसी व अशासकिय संस्थांच्या माध्यमातुन साध्य केलेले उद्दिष्ट्येसांगुन जिल्ह्यात यशस्वीरित्याकार्यक्रम राबवत असल्याचेसांगितले. तसेच संसर्गित लाभार्थ्यांना कलंक व भेदभावाची वागणुक न देता सन्मानाची आपलेपणाची वागणुक देऊन जिवनमान उंचावण्याकरिता सहकार्य करणे, एकटे नाहीत तुम्ही, साथ आहोत आम्ही अशी भावना ठेवावी. तसेच समाजातील लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे सांगितले. जिल्हा पर्यवेक्षक श्री.सुहास कुलकर्णी यांनी सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना पीपीटी द्वारे एचआयव्ही/एड्स विषयी मुलभुत माहिती सांगितली व कर्मचाऱ्यांचे प्रश्नांचे निरसन केले. जिल्हा रुग्णालय बीड येथिल आय सी टी सी समुपदेशक श्री.जनार्धन माचपल्ले यांनी पीपीटीसीटी कार्यक्रमाअंतर्गत संसर्गीत गरोदर मातेपासुन तिच्या होणाऱ्या अर्भकाला संसर्ग होऊ नये याबाबत उपस्थितांना माहिती दिली. तर वैद्यकिय अधिकारी डॉ.अरुण राऊत यांनी उपस्थितांना ए. आर. टी .औषधोपचाराचे महत्व व सातत्य या बाबत मार्गदर्शन केले. सदरिल कार्यशाळेचा अध्यक्षीय समारोप पोलीस निरीक्षक श्री.संतोष पाटील यांनी केला. या प्रसंगी बोलतांना ते म्हणाले की आपण सर्वांनी एचआयव्ही चाचणी करणे महत्वाचे आहे. तसेच विवाहपुर्वी पण आपण आपल्या पाल्याची एचआयव्ही चाचणी करुन घ्यावी. एचआयव्ही संसर्गीत लाभार्थ्यांना सन्मानाची वागणुक दिली पाहीजे.
सदरिल कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.जनार्धन माचपल्ले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. फारोकी एफ.आर.यांनीकेले. सदरील कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती साधना गंगावणे, श्री.सुहास कुलकर्णी, श्री फारोकी एफ.आर. श्री. नवनाथ चव्हाण, श्री महादेव इंगळे व पोलीस अधिक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.








