दारुल उलूम बीडचा साठवा महासंमेलन

Beed

दारुल उलूम बीडचा साठवा महासंमेलन

बीड/वार्ताहर

शहरातील प्राचीन व प्रसिद्ध असलेला आरबी मदरसा दारुल उलूम बीड ६० वा संमेलन दिवस साजरा करण्यात येत आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
अरबी मदरसा हा जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण मराठवाड्यात नावलौकिक पावलेला एक प्रसिद्ध मदरसा आहे इस्लाम धर्माची मुलतत्वे कुरानाचे पाठांतर,पैगंबर चरित्र, इतिहास, तत्त्वज्ञान, यासारख्या विषयात मदरसामध्ये शिकवले जातात.गेल्या साठ वर्षापासून दारुल उलूम बीड आपली सेवा देत आहे.
२४ फेब्रुवारी 2०२२ रोजी संपन्न होत असलेल्या ६० व्या संमेलन दिवस सोहळ्यात मा.अब्दुल जब्बार मजाहिरील  यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना कारी रशीद आहमद साहेब अजमेरी हे  उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
संमेलन दिवस २४ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता मदरसाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे या सोहळ्याच्या निमित्ताने ४२ विद्यार्थ्यांना ज्यांनी कुरआन मुखपाठ केले आहे त्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.१० विद्यार्थ्यांनी तफ्सीरे जलालैन पूर्ण केल्याबद्दल, तसेच १४ विद्यार्थ्यांनी संगणक क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.तरी सर्व नागरिकांनी आपल्या मित्र परिवारास सोबत या सोहळ्यास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मदरसा दारुल उलूम बीड तर्फे करण्यात आले आहेत यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित मुफ्ती आरेफ साहेब,मुफ्ती सगीर साहेब,मौलाना अमीन साहेब,मौलाना चांद साहेब,मुफ्ती मोहियोद्दिन साहेब,मौलाना ताहेर,मौलाना मुख्तार,मौलाना शाकेर,मौलाना अमजद आदि उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter