शिवसंग्राम शहर आघाडीकडून निराधारांना अन्नदान करून शिवजयंती साजरी-शेषेराव तांबे

Beed

शिवसंग्राम शहर आघाडीकडून निराधारांना अन्नदान करून शिवजयंती साजरी-शेषेराव तांबे

 "खूप मोठा हो...निराधारांनी दिला आशीर्वाद "

बीड/प्रतिनिधी

अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत कुळवाडीभूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती वार्ड क्रमांक..०८ मध्ये शिवसंग्रामचे बीड शहर उपाध्यक्ष श्री शेषराव तांबे यांनी आयोजित केली या शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी बीड शहर पोलिस स्टेशनचे पीआय सानप साहेब तसेच पेठ बीड पोलीस स्टेशनचे पीआय पालवे साहेब व दैनिक पार्श्वभूमीचे संपादक गंमत भंडारी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले .या प्रसंगी बीड शहरातील मान्यवर व शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते तसेच जिव्हाळा निराधार केंद्र येथे अन्नदान कार्यक्रम युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैया मेटे, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील,सा.न्याय.विभाग जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, युवक शहराध्यक्ष प्रशांत डोरले, युवक नेते मुकुंद गोरे, सौरभ तांबे, यांच्या हस्ते संपन्न झाला*

शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ.विनायकराव मेटे यांच्या आदेशाने शिवजयंती ही समाज उपयोगी कार्यक्रमाने साजरी केली जावी हा आदेश शिरसावंद्य मानून शिवसंग्रामचे बीड शहर उपाध्यक्ष शेषराव तांबे यांनी शिवजयंतीचे आयोजन केले ही शिवजयंती बेघर निवारा केंद्र येथे अन्नदान करून साजरी केली त्यांच्या बरोबर पूर्ण वेळ घालवला व खऱ्या अर्थाने शिवजयंती सार्थक झाली  छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वसामान्य गोरगरीब वंचित , उपेक्षित , शेतकरी, कामकरी , कष्टकरी यांना एक आधार देणारा , यांचे मनोबल वाढणारा , ऊर्जा देणारं असं शिवचरित्र आहे त्यांच्या विचारांना आज चारशे वर्ष पूर्ण होत आहेत . कोणताही व्यक्ती किंवा समाजातील जे विशेष घटक आहे हे मागासलेले न राहता "एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ " या म्हणीप्रमाणे त्यांच्यामध्ये आपण सर्वजण एक आहोत ही एकात्मतेची भावना खऱ्या अर्थाने या शिवजयंतीच्या माध्यमातून निर्माण होत आहे हे रयतेच राज्य आहे इथे कोणीही लहान-मोठा नाही आपण सर्वजण एक आहोत हा विचार खऱ्या अर्थाने शिवजयंतीच्या माध्यमातून हा मोठा संदेश शेषराव तांबे यांच्या प्रयत्नातून जनतेच्या मनामध्ये रुजवला गेला .खऱ्या अर्थानं शिवजयंतीचा सार्थक झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही

शिवसंग्रामचे शहर उपाध्यक्ष शेषराव तांबे हे अनेक दिवसापासून सामाजिक चळवळीमध्ये काम करत असतात शहरातील जे काही सामाजिक प्रश्न असतील यावर ते आवाज उठवतात . रस्त्याची कामे असोत , नाल्यांची कामे असोत, वीज, पाणी अश्या अनेक नागरिकांच्या समस्येवर  सातत्याने आवाज उठवत असतात ते बीड शहरातील कोरोना महामारिच्याच्या काळामध्ये ही त्यांनी महत्त्वाची भूमिका घेऊन येथील नागरिकांना लस उपलब्ध करून दिली, लसीकरण मोहीम राबवली अशा विविध कामाच्या माध्यमातून त्यांचे व्यक्तिमत्त्व या वार्डमध्ये लोकप्रिय आहे आणि कालच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाने अजून त्यामध्ये भर घातली गेली शेषरावजी तांबे यांच्या हातून गोरगरीब वंचित उपेक्षित त्यांची सेवा घडो तसेच त्यांच्या हात बळकट करण्यासाठी युवा तरुण त्यांच्याबरोबर सहभागी होत आहे

या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित वॉर्डातील उद्योजक नागरिक विलास गायकवाड ,नितीन मंत्री,राजू धुप्पड .लोहिया शेठ,अशोक खोड, नाहार शेठ, डॉ. बडजाते, ॲड.कुक्कडगावकर, सुदाम कोकाटे,गुरुल्ले साहेब, भोले अरुण,जोगदंड,डॉ.बनसोडे,ओम शेठ बाहेती,संजय जाधव, महिला मंडळ उपस्थीत होते*

Sharing

Visitor Counter