आयशा फातिमा हूमेर फारुकी चा पहिला रोजा पूर्ण
Beed

आयशा फातिमा हूमेर फारुकी चा पहिला रोजा पूर्ण
बीड/प्रतिनिधी
इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात 'रोजा'ला विशेष महत्त्व आहे.या महिन्यात लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच पहाटे सहेरी करून रोजा (उपवास) ठेवतात.बीड शहरातील तेरवी लाईन येथील 7 वर्षीय आयशा फातिमा हूमेर फारुकी या लहान मुलीने आपल्या जीवनातील पहिला रोजा बुधवार दि.२1 मे रोजी पूर्ण केला.मे महिन्याचे कडक ऊन अशात दिवसभर अन्न पाण्या शिवाय हा रोजा त्याने ठेवला.सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या कुटुंबियांसोबत त्याने रोजा इफ्तारी केली.कमी वयात आयशा फातिमा हूमेर फारुकी याने रोजा पूर्ण केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.








