नगरसेवक ' नावाला राहिलेल्या निष्क्रिय पुढाऱ्यांना व बंडखोरी करणाऱ्यांना बीडची जनता घरी बसवणार इमरान जागीरदार

नगरसेवक ' नावाला राहिलेल्या निष्क्रिय पुढाऱ्यांना व बंडखोरी करणाऱ्यांना बीडची जनता घरी बसवणार इमरान जागीरदार
बीड/प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षापूर्वी निवडणुकीमध्ये निवडून आलेले नगरसेवक पाच वर्षात नावापुरते राहिले व बंडखोरी करणारे सुंध्दा निवडणूकीच्या रिंगणात उतरले सध्या शहरात नगरपरिषद निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे . आगामी येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये जुने - नव्या इच्छुकांची बहुगर्दी दिसणार आहे . येणारी निवडणूक चुरशीची ठरणार हे मात्र तितकेच खरे आहे कारण या आधी निवडून दिलेले काही ' नगरसेवक ' नावापुरतेच राहिल्याने शहरातील मतदार निवडणुकीच्या वेळेस जनतेचे पाय धरून डोकं टेकून मतांची भीक मागणारे निवडून आल्यावर जनतेच्या मूलभूत गरजांकडे कसे पाठ फिरवून फक्त खुर्ची गरम करण्यापुरतेच मर्यादित राहिलेले आहेत . शिवाय या पदाच्या जिवावर आपला व नातेवाईकांचा स्वार्थ साधल्याची चर्चा देखील चौका चौकात होत आहे . त्यामुळे आगामी निवडणुकीत काही नगरसेवकांचा ' मी ' पणा उतरून त्यांना घरचा रस्ता दाखवणार यूव नेते इमरान जागीरदार यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे
सर्वसामान्य जनतेतुन चर्चा होऊ लागली आहे की, यावेळी नवीन गडी नवीन राज आता भावी उमेदवाराचे भवितव्य जनताच ठरवणार . लबाड जुन्याला डिच्चू आणि नविन ला संधी मिळणार अशी चर्चा देखील यानिमित्ताने चौकाचौकात रंगत आहे . आता निष्क्रिय नगरसेवकांना व बंडखोरी करणाऱ्यांना घरी बसवून प्रमाणिक व सतत समाजासाठी काम करणाऱ्या सामाजिक न्यायावर प्रहार " दुष्टांचा संहार पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवाराला या निवडणुकीत संधी देतील अशी आशा शिवसंग्राम युवानेते इमरान जागीरदार यांनी व्यक्त केली आहे . जनतेने निवडून दिलेले काही निष्क्रिय नगरसेवक फक्त नावाला होते ज्यांनी मागील काळात जनतेच्या मुलभूत गरजा पण पूर्ण केल्या नाहीत . त्यामुळे मायबाप जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही . धर्माच्या जातीच्या पक्षाच्या , पैश्याच्या व दादागिरीच्या बळावर निवडून दिलेले नगरसेवक नावाला राहून स्वतःचा स्वार्थ साधत आहेत . अश्या निष्क्रिय नगरसेवकांना बीड मधील जनता घरी बसवून सुजान , सुशिक्षित , निःस्वार्थी , होतकरू , राजकीय ज्ञान असलेल्या , समाजहित पाहणाऱ्या , निधर्मी , जातवीरहित उमेदवाराला नगरसेवक म्हणून निवडून देतील . अशी आशा पण पञकात नमुद केली . आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत विकासात्मक दृष्टी , सामाजिक भान आणि निःस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या सुजाण , सुशिक्षित नागरीकांनी उमेदवारी अर्ज भरून नगरपालिका सार्वत्रिक निवणुकीत उतरावे असे आवाहनही शिवसंग्राम युवा नेते इमरान जागीरदार यांनी व्यक्त केली आहे .








