मनुर येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार साहेब कार्यवाही करणार ?

मनुर येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार साहेब कार्यवाही करणार ?
याप्रकरणी चौकशी झाली असून बिल देण्याचा सपाटा चालू आहे दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार . अविनाश ढगे प्रहार जनशक्ती पक्ष युवक तालुका उपाध्यक्ष माजलगाव
बीड/प्रतिनिधी
माजलगाव शहरालगत हाकेच्या अंतरावर मनुर हे गाव रेणुका माता जागृत देवस्थान मुळे सर्वदूर परिचित आहे या गावांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे
मनुर गावा मध्ये आमदार फंडातून व इतर योजनेतून जवळपास अंदाजे 1 कोटी रुपये निधी टाकण्यात आला होता हा निधी गावातील नाली बांंधकाम करताना पिण्याच्या पाण्याची पाइपलाईन मधोमध आलेली आहे , सिमेंट रस्ते, शाळा बांधकाम,व दलीत वस्ती मध्ये नाली बांधकाम सिमेंट रस्ते , समशान भूमी परिसरातील कॉंक्रिटीकरण, पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन या साठी निधी आला होता पण हे काम खराब झाल्याचे येथील गावातील युवक अविनाश ढगे (युवक तालुका उपाध्यक्ष) प्रहार जनशक्ती पक्ष यांनी पंचायत समिती माजलगाव येथे तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीची दखल घेऊन माजलगाव पंचायत समिती सह गटविकास अधिकारी रामचंद्र रोडेवार यांनी चौकशी केली असता या चौकशीमध्ये काम अत्यंत खराब झाले आहे असे निदर्शनास आले व तसा अहवाल निवेदन कर्ते व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आला व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 23 डिसेंबर 2021 रोजी सरपंच व ग्रामसेवक यांना नोटीस काढून याप्रकरणी खुलासा मागितला होता पण यामध्ये काय खुलासा झाला हे स्पष्ट कळाले नसुन सहगटविकास अधिकारी रोडोवार यांना विचारणा केली अस्ता उडवा उडवी चे उत्तर मिळाले म्हणून याप्रकरणी बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सरपंच व ग्रामसेवक यांची चौकशी केली अस्ता चौकशी मध्ये काय निष्पन्न झाले व मुख्य कार्यकारी अधिकारी हे सबंधितावर कायवाही करण्यांत यावी.असे निवेदन देण्यात आले.








