गावंदर्यात मोजमाप करुन दलितांच्या स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न तहसीलदार यांनी दडपला- डॉ जितेंद्र ओव्हाळ

गावंदर्यात मोजमाप करुन दलितांच्या स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न तहसीलदार यांनी दडपला- डॉ जितेंद्र ओव्हाळ
चोवीस तासात जागा मोकळी करा
किल्लेधारुर/प्रतिनीधी
धारुर तालुक्यातील गांवदरा गावात बैध्द समाजातील महिलेचे प्रेत तब्बल 20 तास धारुर तहसील कार्यालयात ठेवल्या नंतर तहसीलदार गांवदर्यात आले पण अजुनही येथिल स्मशानभूमीची जागा मोकळी केली नाही याचा तीव्र निषेध डॉ.बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी शुक्रवारी केला
तालुक्यातील गावंदरा येथे शुक्रवारी भेट देऊन समाज बांधवाची भेट घेतली धारुर तहसीलदार यांनी केवळ अत्यंसंस्कार होईपर्यंत जागा दिली का? जागेचा नकाशा का देत नाही तहसीलदार यांना फोन करून तातडीने जागेचा नकाशा देण्याची व्यवस्था करावी आशी मागणी केली चोवीस तासाच्या आत जागेचा नकाशा द्या,स्मशानभूमीसाठी निधी उपलब्ध करून द्या अन्यथा जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते बरोबर घेऊन जागा मोकळी करु असा इशारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी दिला.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांतकुमार, धारूर तालुका अध्यक्ष सनि गायसमुद्रे, राहूल रोकडे, बाळासाहेब कांबळे,श्रीपती वाव्हळ, दिलीप पायके,आशोक निसरगंध,बापू सौंदरमल,भगवान पायके, आविनाश घायाळ, आनिल घडसिंग,महादेव वाघमारे उपस्थित होते








