कोरडेवाडीचे धडाडीचे नेतृत्व हरपले

Beed

कोरडेवाडीचे धडाडीचे नेतृत्व हरपले

माजी सरपंच मधुकर गणपतराव कोरडे यांचे निधन

बीड/प्रतिनिधी

केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील रहिवासी माजी सरपंच मधुकर गणपतराव कोरडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दि.15 रोजी रात्री दोन वाजताच्या दरम्यान निधन झाले.म्रत्यु समयी त्यांचे वय ६५ होते. मधुकर गणपतराव कोरडे हे माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर व सध्याच्या काळात अक्षय मुंदडा यांचे निकटवर्तीय होते.केज तालुक्यासह विडा सर्कल मध्ये प्रसिद्ध ऊसतोड कामगार मजुरांचे मुकदम होते. मधुकर कोरडे यांना अध्यात्मिक क्षेत्राची आवड होती ते कायम कोरडेवाडी व परिसरात अखंड हरिनाम सप्ताहात किर्तन, भजन असेल तेथे त्यांची हजेरी असायची प्रामुख्याने गावातील अखंड हरिनाम सप्ताहात त्यांचा हिरारीने सहभाग असायचा.मधुकर कोरडे यांनी कोरडेवाडीचा सलग तीन टर्म म्हणजे पंधरा वर्षे सरपंच म्हणून गावचा कारभार केला होता.त्यांच्या कार्यकाळात कोरडेंनी गावचा विकास केला गावात विविध विकास कामे केली गावातील सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून दिला.त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,पत्नी,सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने गावावर शोककळा पसरली. त्यांच्या वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार कोरडेवाडी येथील शेतात करण्यात आले. सर्व गावकऱ्यांनी आपापली दुकाने बंद करून दुखवटा पाळला होता. कोरडे कुटुंबीयांच्या दु:खात दै.झुंजार नेता परीवार सहभागी आहे.

Sharing

Visitor Counter