अंबड तालुक्यातील शिरनेर येथील एका 40 तरुणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Beed

अंबड तालुक्यातील शिरनेर येथील एका 40 तरुणांचा अहवाल पॉझिटिव्ह

अंबड शहरासह तालुक्यातील आकडा आता 5 वर

अंबड़/अक्षय गोरुले

संपूर्ण देशात या विषाणूने तर जगभरात हाहाकार माजवला असून अंबड शहरासह तालुक्यातील आकडा 4 इतका होता, मात्र त्यात बुधवारी अंबड तालुक्यातील शिरनेर येथील 40 वर्षीय एका पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ होऊन आता हा आकडा पाच वर पोहोचला आहे अंबड तालुक्यातील कानडगाव येथील तीन पैकी दोन रुग्णांचे अहवाल यापूर्वीच पॉझिटिव्ह आले होते, त्यानंतर राहिलेला एक जणांचा सुद्धा अहवाल पॉझिटिव्ह आले आणि कानडगाव येथील रुग्णांची संख्या तीन तर अंबड शहरातील संख्या एक असे एकूण चार पॉझिटिव रुग्ण अंबड तालुक्यात होते मात्र त्यात पुन्हा शिरनेर तालुका अंबड येथील 40 वर्षीय एका रुग्णांची भर पडून हा आकडा आता पाच वर पोहोचला आहे शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरनेर या गावातील 40 वर्षीय तरुणांचा अहवाल हा दिनांक 20 मे रोजी पॉझिटिव्ह आला आहे तालुक्यात व ग्रामीण भागात या कोरोना रोगाची धास्ती लागली आहे. तसेच भीतीचे वातावरण तयार झालेले दिसून येत आहे.

Sharing

Visitor Counter