तलावातील गाळ उपसणाऱ्या वाहनचालकाची करून तपासणी करावी - रवींद्र ढोबळे

तलावातील गाळ उपसणाऱ्या वाहनचालकाची करून तपासणी करावी - रवींद्र ढोबळे
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज.
आष्टी तालुक्यामध्ये सध्या कोरड्या प्रकल्पातील गाळ उपसण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून बाहेरच्या जिल्ह्यातील वाहने या कामावर रात्रंदिवस चालू असून या वाहनाच्या चालक व स्वच्छक सहाय्यक यांची कोरोना तपासणी तात्काळ करावी अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस (आय) मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र ढोबळे पाटील यांनी केली आहे. जिल्हाधिकारी आणि आष्टी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
बाहेरच्या जिल्ह्यातील नागरिकांनी आष्टी तालुक्यात आणि बीड जिल्ह्यात कोरोना पसरवला आहे त्याचवेळी आष्टी तालुक्यातील रुटी इमणगाव आणि दादेगाव या प्रकल्पातील गाळ उपसण्याचे काम चालू असून या कामावर सुमारे २०० ते ३०० वाहने सुरू आहेत.या वाहनांचे चालक आणि स्वच्छक सहाय्यक यांची संख्या पाचशेच्या आसपास आहे. त्यांचा गाळ उपसताना आणि शेतात टाकताना, प्रवास करताना हजारो लोकांशी संपर्क होत असल्याने कोरोणाचा धोका आहे त्यामुळे या संबंधित चालकांची सहाय्यकांची तात्काळ तपासणी करण्याची आवश्यकता आहे असे निवेदनात म्हटले आहे.








