आष्टीतील ल कंत्राटी एनआरएचएम अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फीत लावून सुरु ठेवले काम

Beed

 आष्टीतील ल कंत्राटी एनआरएचएम  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  काळ्या फीत लावून सुरु ठेवले काम 

आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज.

नियमित शासन सेवेमध्ये अनुभवाच्या व सशिक्षणाच्या आधारे बिनशर्त समायोजन करावे,समायोजन होईपर्यंत व समायोजनानंतर उर्वरीत कर्मचाऱ्यांना
राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये मंजुर असलेली नविन वेतनपध्दतीने निर्गमित आदेशापासून पूर्ण फरकासहित वेतन तत्काळ देण्यात यावे,नियुक्‍ती दिनांकापासुन सर्व कर्मचारी यांना प्रतिवर्ष ५ टक्‍के वार्षीक वेतनप्रमाणे अधिकच्या वार्षीक वेतनवाढी देण्यात याव्यात,
यापुर्वी राज्य शासनाने जसे मस्टर कारकुन, अंशकालीन कर्मचारी,
बंधपत्रीत आरोग्य परिचारिका,वैद्यकीय अधिकारी,आमदार निवास कर्मचारी आदींचे
जसे सरळ समायोजन निर्णय घेतला आहे त्याच प्रमाणे आमचे समायोजन व्हावे या व ईतर मागण्यांसाठी आष्टी तालुक्यातील सर्व कंत्राटी (एनआरएचएम) अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  दि.१९ मे पासून काळ्या फित लावून काम सुरु ठेवुन ठाकरे सरकारचा निषेध व्यक्त करत आहेत. 
         कोरोनाच्या लढ्यात आरोग्य विभागात कोविड- १९ उपचार सुविधांच्या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी या कोरोना महामारीच्या लढाईत सर्व प्राणपणाने लढत आहेत अशा परिस्थीतीत पंधरा पंधरा तास सेवा देवुन आपले कर्तव्य बजावत आहेत. जीव धोक्यात घालून काम करीत असताना सरकारकडून आम्हांला डावलले जात असल्याने या कर्मचाऱ्यांत रोष उफाळू लागला आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना (एनआरएचएम)
कायम करण्याऐवजी नव्याने भरतीप्रक्रिया राबविण्यात येत असल्याने सर्व कंत्राटी (एनआरएचएम) कर्मचाऱ्यांनी २६ मेपासून काम बंद आंदोलन करण्याचा ईशारा मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
         कोविड- १९ संकट आव्हानात्मक होत असताना या काळात आंदोलन करण्याचा पावित्र्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील (एनआरएचएम) कर्मचाऱ्यांची खदखद पुढे येऊ लागल्याने सरकार आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.
कंत्राटी कर्मचारी (एनआरएचएम) आरोग्य विभागात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत अनेक कर्मचारी १० ते १५ वर्षे कंत्राटी पद्धतीने व तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहेत.आम्हाला सरकारी सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे अशी या कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांची मागणी आहे.
      कोरोना संकटकाळात शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांद्या लावून कंत्राटी काम करत आहेत. कंत्राटी पदावर गेली १० वर्षे काम करणाऱ्या कर्मचारी यांना १० हजार रुपये मानधन आहे. त्याच पदावर आज नवीन कंत्राटी भरती केली तर त्यांना १७ हजार मानधन आहे. हा कंत्राटी कर्मचाऱ्यांवर एक प्रकारचाअन्याय आहे.
कोरोनाच्या लढ्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत कायम करून घेण्याच्या आश्वासनाचा सरकारला विसर पडला आहे. सरकारने कायमस्वरूपी पदे भरण्यासाठी भरतीप्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या माध्यमातून सरकारच्या या धोरणाविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर समकक्ष रिक्त पदावर बिनशर्त समायोजन केले नाही तर दि.२६ मे पासून राज्यात सर्व ठिकाणी काम बंद आंदोलन केले जाईल, असा ईशारा संघटनेने दिला आहे.

Sharing

Visitor Counter