जिल्हाधिकारी साहेब जिल्हा बाँर्डर सील करा बाहेरचे लोकं येवू देवू नका -प्रा. इलियास इनामदार

जिल्हाधिकारी साहेब जिल्हा बाँर्डर सील करा बाहेरचे लोकं येवू देवू नका -प्रा. इलियास इनामदार
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्हयाचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मा. राहूल रेखावार साहेब, पोलीस अधीक्षक मा. हर्ष पोद्दार साहेब, मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात साहेब व सर्व जिल्हा प्रशासन टिम दोन अडीच महिन्यापासून डोळयात तेल घालून आपल्या जीवाची पर्वा न करता बीड जिल्हयाला संभाडत होती दोन महिने जिल्ह्यात एक पेशंट नव्हता पण केंद्र शासनाने जिल्हा व राज्यातील लोकांना आपापल्या घरी जाण्याची मुभा दिली आणि पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण आणि देश प्रदेशातून लोकांचा लोंढा बीड जिल्ह्यात येणं सुरु झालं आणि बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये कोरोना वायरसचे पेशंट मिळणे सुरु झाले. जिल्हा प्रशासनाकडे अजून वेळ आहे तात्काळ बीड जिल्हा बाँर्डर सील करावी व लोकांना जास्तीचा दिलेला वेळ कमी करावा नसता बीडची पण पुणे-मुंबई सारखी अवस्था होईल. अशी मागणी बीड जिल्हाधिकारी यांना भेटून लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार निवेदन देणार आहे.
