कानिफनाथ आश्रमात लाख रुपयांचा गुटखा जप्त!

Beed

कानिफनाथ आश्रमात लाखो रुपयांचा गुठखा जप्त!

 जालना/प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये कानिफनाथ आश्रमात पोलिसांनी धाड टाकून लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. पोलिसांना या बाबत माहिती मिळताच त्यांनी ही कारवाई केली आहे.

जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये रोहिलागड शिवारातील पुजारी मृत पावल्यामुळे कानिफनाथ आश्रम बंद होता. या आश्रमात लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी रात्री 2 च्या सुमारास आश्रमातील एका खोलीवर पोलिसांनी धाड टाकून झडती घेतली असता, त्या खोलीत विविध गुटख्याचा मोठा साठा आढळून आला.

Sharing

Visitor Counter