अंबड शहरात खळबल जनक बातमी एक रुघ्न कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने भीतेचे वातावरण

अंबड शहरात खळबल जनक बातमी एक रुघ्न कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने भीतेचे वातावरण
अंबड़ वंजार गल्ली सील, कानडगाव दोन ते अंबड एक असे तीन संशयित रुग्ण
अंबड/अक्षय गोरुले
संपूर्ण देशात तसेच अनेक राज्यात कोरोनाने थैमान घातला असता असतांनासुद्धा अंबड तालुका हा कोरोना पासून मुक्त होता. मात्र आता अंबड शहरात धोरणाने शिरकाव केला असून वंजर गल्लीमध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी त्यांच्या फौजफाट्यासह जाऊन सोमवारी वंजार गल्ली पूर्णपणे सील केली आहे. काही दिवसापूर्वी मुंबई येथून तीन जण आहे कानडगाव येथे आले होते. त्या पैकी दोन जणांना व्काँरंटाईन करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचे नमुने जिल्हा रुग्णालयातर्फे दिनांक 8 में रोजी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. सदर रुग्णाचे आहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी दिली होती त्यामुळे पोलिसांनी कानडगाव व डोमेगाव पूर्णपणे सील केल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण होऊन चिंतेत वाढ झाली होती. अंबड तालुक्यातील कानडगाव येथील दोन तर आता नव्याने अंबड शहरातील वंजार गल्ली येथील एक नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने अंबड तालुका शहरासह कोरोना रुग्णांचा आकडा आता तीन वर पोहोचल्याने पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी अतिदक्षता घेत आपल्या फौजफाट्यासह आरोग्य विभाग तसेच नगरपरिषद प्रशासन यांना पाचारण करून अंबड शहरातील वंजार गल्ली पूर्णपणे सील करण्यात आली आहे. सध्या नंबर शहरामध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले दिसून येत आहे.








