सक्षम महाराष्ट्र ग्रुपच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील गरजू व गरिब होतकरूंना जेवनाचे वाटप
Beed

सक्षम महाराष्ट्र ग्रुपच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील गरजू व गरिब होतकरूंना जेवनाचे वाटप
बीड/प्रतिनिधी
कोरोनाच्या या महाभयंकर विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी बीड शहरासह देशभरात २२ मार्चपासून लाॅकडाउन असल्यामुळे गरजू व गरीब हातावर पोट असलेले कामगार मजूर व त्यांचे कुटुंबीय या लाॅकडाउन च्या काळात अडचणीत असल्याने सक्षम महाराष्ट्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सोहेल पटेल यांच्या सूचने सक्षम महाराष्ट्र ग्रुपचे बीड जिल्हाध्यक्ष व त्यांचे सहकारी यांच्या वतीने बीड शहरात मागील काही दिवसापासून दोनशे ते अडीचशे लोकांना जेवनाचे वाटप करण्याचे काम सुरू आहे.








