संचारबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आ.धसांवर गुन्हा दाखल.

Ashti

संचारबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आ.धसांवर गुन्हा दाखल

आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज.
 
तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोना संसर्ग बाधित सात रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. तेथे कोरोना संसर्ग बाधित रुग्ण सापडल्यामुळे सांगवी पाटणचा कंटेंटमेंट झोनमध्ये समावेश आहे.
आ. सुरेश धस यांनी कंटेंटमेंट झोनमध्ये जाऊन तेथील नागरिकांना धीर दिला. योग्य काळजी घेण्याची आवाहन केले. कंटेंटमेंट झोनमध्ये प्रवेश करून संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून आ.धस यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याआधी ही आ. धस यांच्यावर जिल्हाबंदी आदेश तोडून ऊसतोड कामगारांना मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे.

Sharing

Visitor Counter