शिरूर तालुक्यात ओबीसी संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष कु. माधुरीताई माळवे यांच्याकडून शिरूर येथे दोर सिंहटायगर हँडवॉश वाटप करण्यात आले

शिरूर तालुक्यात ओबीसी संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष कु. माधुरीताई माळवे यांच्याकडून शिरूर येथे दोर सिंहटायगर हँडवॉश वाटप करण्यात आले
बीड/प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात ओबीसी संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष कु. माधुरीताई माळवे यांच्याकडून शिरूर येथे दोर सिंहटायगर हँडवॉश वाटप करण्यात आले.
पूर्ण देशभर कोरोना सारख्या महा मारीला हरवण्यासाठी घरातच बसा हा संदेश देत माधुरीताई माळवे यांच्याकडून गोरगरिबांना धान्य वाटप व टारझन वाटप करून विनंतीपूर्वक नागरिकांना संदेश देण्यात आले माधुरीताई यावेळेस म्हणाल्या आता जर आपण घरात बसून राहिले तर उद्याचा दिवस आपण पाहू शकतो यासाठी शिरूर तालुक्यातील नागरिकांना माधुरीताई हा एकच संदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोच केला घरीच रहा सुरक्षित रहा घराबाहेर पडू नका अत्यावश्यक सेवा असेल तरच बाहेर पडा व असाच सूचना ओबीसी संघटनेच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
तसेच महाराष्ट्रात सुद्धा सर्व ओबीसी संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी माधुरीताई माळवे यांच्या संदेशाचे पालन करून प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडली नव्हे तर प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोराने काम चालू केले मिळेल अशी मदत करण्यात आली ओबीसी संघटनेच्या माधुरीताई माळवे यांच्या आदेशाचे पालन पूर्ण ठिकठिकाणी जिल्ह्यात आपापल्या ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले माधुरीताई माळवे संस्थापक-अध्यक्ष ओबीसी संघटना महाराष्ट्र राज्य.








