जिल्ह्यात कोरोना बाधित दोन रुग्णांची भर, एकूण अकरा तर एकाचा मृत्यू
Beed

जिल्ह्यात कोरोना बाधित दोन रुग्णांची भर, एकूण अकरा तर एकाचा मृत्यू
बीड/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
बीड जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर संसर्ग बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. आज माजलगाव तालुक्यातील टाकुरवन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावातून पाठवण्यात आलेल्या नमुन्यांपैकी दोघांचे अहवाल पोजीटिव्ह आले आहेत अशी माहिती लातूर येथील स्व. विलासराव देशमुख विषाणू प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. अजून दोघांचे अहवाल येणे प्रलंबित आहेत.
पोजीटिव्ह आलेले कुटुंब हे मुंबईहुन गावी आलेले आहे. अहवाल प्रलंबित असणारे व पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याचे समजते.








