उद्यापासून कडा बंद;ग्रामपंचायतचा निर्णय
Ashti

उद्यापासून कडा बंद;ग्रामपंचायतचा निर्णय
आष्टी/तुकाराम गणगे.
बीड प्रसार न्युज.
तालुक्यातील सांगवी पाटण येथे काल कोरोना संसर्ग बाधित सात रुग्ण आढळून आले. त्यापैकी एका महिलेचा आज पहाटे मृत्यू झाला. त्या अनुषंगाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडा ग्रामपंचायतने याविषयी निर्णय घेऊन कडा शहर दि १९ मे ते २२मे पर्यंत पूर्णपणे बंद असणार आहे.
सामाजिक माध्यमातून उद्यापासून काही दिवस आष्टी/कडा बंद अशा पोस्ट व्हायरल होत आहेत या विषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी बीड प्रसारने नायब तहसीलदार शारदा दळवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फक्त कडा बंद आहे.बंदचा निर्णय हा ग्रामपंचायत स्तरावर घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.








