औरंगाबादेत : कोरोनाचा ३२ वा बळी; ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Beed

औरंगाबादेत : कोरोनाचा ३२ वा बळी; ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

 औरंगाबाद/प्रतिनिधी

१३ मे पासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. खाजगी लॅब मध्ये कोरोना पॉझिटिव्ह निदान झाल्यावर त्यांना घाटीत संदर्भित करण्यात आले होते.

औरंगाबाद : मदनी चौक येथील ६५ वर्षीय कोरोना बाधीत व्यक्तीचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी सहा वाजता मृत्यू झाला. हा शहरातील आतापर्यंतचा ३२ वा बळी ठरला आहे, असे घाटीचे माध्यम समन्वयक डॉ अरविंद गायकवाड यांनी सांगितले.

१३ मे पासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. खाजगी लॅब मध्ये कोरोना पॉझिटिव्ह निदान झाल्यावर त्यांना घाटीत संदर्भित करण्यात आले होते. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांच्यावर अतीवदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांचा रविवारी सायंकाळी सहा वाजता मृत्यू झाला. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोरोनामुळे झालेला न्यूमोनिया यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ गायकवाड यांनी कळवले आहे..

Sharing

Visitor Counter