गोंदी पोलीस ठाण्याच्या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी तडकाफडकी केल्या बदल्या

Beed

गोंदी पोलीस ठाण्याच्या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी तडकाफडकी केल्या बदल्या

अधिकार्‍यांमध्ये अधून-मधून खटके, एस.चैतन्य  तडकाफडकी ने बदल्या

जालना/प्रतिनिधि

अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस अधिकार्‍यांना पोलीस निरीक्षक एस.चैतन्यांनी यांनी आज शुक्रवारी तडकाफडकी हलवले असून गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या जागी आता तालुका जालना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पोलिस ठाण्यात चार महिन्यापूर्वी झालेले प्रभारी अधिकारी मिलिंद खोपडे आणि इतर दोन अधिकार्‍यांमध्ये अधून-मधून खटके उडत होते ही बाब पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्यांनी गंभीर दखल घेत येथील तीनही अधिकाऱ्यांची आज बदली केली आहे. गोंदी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. मिलिंद खोपडे यांची पोलीस नियंत्रण कक्ष पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांची चंदनझिरा आणि उपनिरीक्षक भागवत नागरगोजे यांची सदर बाजार पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

तालुका जालना पोलीस ठाण्यातील स.पो.नि.रत्नदीप जोगदंड यांची गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच चंदंझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले आणि सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गजानन कौळसे यांची गोंदी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांमधील अंतर्गत यामुळे बेबनवामुळे पोलीस अधीक्षक एस.चैतन्य  तडकाफडकी बदल्या केल्याची चर्चा चालू आहे.

Sharing

Visitor Counter