बीड नगर पालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी-हाफेज अश्फाक

बीड नगर पालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी-हाफेज अश्फाक
बीड/प्रतिनिधी
नगर पालिकेतून पासेस वाढवून देणे
करण्यात येते की , बीड शहरात संचारबंदी लागू आहे. संचारबंदी शिथिल झालेल्या वेळेत भाजीपाला व फळे विक्रीसाठी परवानाधारकांना मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी पासेस बंधनकारक आहे मात्र नगर पालिकेतून विक्रेत्यांना पासेस दिले जात नाहीत. अनेकवेळा चकरा मारून आणि कागदपत्रे देवूनही पासेस न देता ते बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मुख्याधिकारी गुट्टे साहेब आणि पालिकेचे अन्य कर्मचारी भाजी - फळ विक्रेते यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. भाजीपाला नाल्यात फेकून देणे , कचऱ्याच्या गाडीत टाकणे , हातगाडे उचलून टाकणे आशा प्रकारे त्रास दिला जात आहे. काही ठिकाणी पासेस असतानाही मारहाण झाली. डीवायएसपी सावंत साहेब यांच्यासमोर असे प्रकार घडले. त्यांच्यासोबतच्या कर्मचाऱ्यांनीही विक्रेत्यांना मारहाण केली. पासेस मागितले तर दिले जात नाही आणि भाजीपालाही विकू दिला जात नाही.वारंवार होणाऱ्या अशा प्रकारामुळे नागरिक थेट आम्हांला जाब विचारण्यासाठी येत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकवेळी नागरिक , विक्रेते आणि शेतकरी आमच्या घरी येत आहेत.
यासंदर्भात मा.जिल्हाधिकारी साहेबांनी तातडीने लक्ष घालून गोर गरीब विक्रेते , सामान्य शेतकरी यांच्यावर होणारा अन्याय थांबवून मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना निलंबित करावे. नियमानुसार मागणी करणाऱ्या प्रत्येकाला याबाबत पासेस देण्यात ही विनंती.








