आ.धस यांच्या प्रयत्नाने आष्टी तालुक्यातील १०५ परप्रांतीय मजूर गावी पोहोचले

आ.धस यांच्या प्रयत्नाने आष्टी तालुक्यातील १०५ परप्रांतीय मजूर गावी पोहोचले
आष्टी/ प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
आष्टी तालुक्यातील विविध गावात आलेले सुमारे ८० मजूर सोमवारी तर २५ मजूर बुधवारी त्यांच्या गावी रवाना झाले . ८० मजूर रेल्वेने तर २५ मजूर एस टी बसने रवाना झाले . आ सुरेश धस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेतला.
टाळेबंदीमध्ये शिथिलता आल्यापासून विविध गावात अडकलेले परप्रांतीय मजूर आपापल्या गावाकडे जाण्यास उत्सुक आहेत . अशा मजुरांनी आ सुरेश धस आणि तहसीलदार निलिमा थेऊरकर यांच्याशी संपर्क साधला. सोमवारी ८० मजूराना त्यांच्या गावी जाण्यासाठी नगर रेल्वे स्टेशन पर्यंत पाठवण्यात आले . तेथून त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वे तिकीट देखील कन्फर्म करून देण्यात आले . आष्टी येथील सुनील रेडेकर , सचिन रानडे , चिंटू अग्रवाल , कडा येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे यांनी यासाठी प्रयत्न केले . छत्तीसगड राज्यातील २७ तर उत्तर प्रदेश मधील ५३ मजूर सोमवारी गावी परतले . तर बुधवारी मध्यप्रदेशातील २५ मजुरांना एस टी बसने मध्य प्रदेश सीमेपर्यंत सोडण्यात आले.








