"रात्रंदिवस युद्ध करती धोका आहे जानुन, आपण त्यांना मदत करु हो घरामध्ये राहुन.. " लोककलावंत दीपक शिंदे यांची गीतांमधून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती.

"रात्रंदिवस युद्ध करती धोका आहे जानुन, आपण त्यांना मदत करु हो घरामध्ये राहुन.. " लोककलावंत दीपक शिंदे यांची गीतांमधून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती
आष्टी/तुकाराम गणगे.
बीड प्रसार न्युज.
कोरोनाव्हायरस या महामारीने संपूर्ण जगामध्ये मनुष्य जातीमध्ये हे थैमान घातले असून हा व्हायरस रोखण्यासाठी आज संपूर्ण देश जाग्यावर ठप्प झाला आहे. रस्त्यावर फक्त पोलीस ,जवान ,डॉक्टर्स, नर्स, फार्मासिस्ट, आशा वर्कर्स, सफाई कामगार, प्रशासनाचे अधिकारी हे लोक असून हे लोक कोरोना व्हायरस या संसर्गजन्य रोगाबरोबर प्रत्यक्ष दोन हात करीत असून त्यांना प्रोत्साहन देणे हे सर्व जनतेचे आद्यकर्तव्य आहे. अशाच आष्टी येथील लोककलावंत दीपक शिंदे यांनी स्वतः गीते तयार करून, स्वतः त्याला चाल देऊन युट्युब, व्हाट्सअप ,फेसबुक या माध्यमातून प्रसारित केले आहेत. त्याच बरोबर आज जे लोक इतर सर्वसामान्य लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना हा संसर्गजन्य आजार होऊ नये यासाठी रस्त्यावर उभी आहेत परंतु आपलेच काही समाजबांधव ह्याच कोरोना योध्दांना त्रास देत आहेत. लॉक डाऊन चा नियम न पाहता विनाकारण रस्त्यावर, गावामध्ये हे फिरताना दिसल्याने प्रशासनाला यांना रोखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही लोकांनी तर चक्क याच कोरोनाव्हायरस योध्दांवर हल्ले ही केलेले आहेत. अशा लोकांसाठी ही ही दीपक शिंदे यांनी माणसा माणसा तू कधी होणार माणूस, कोरोनामहामारी मध्ये तू कधी राहणार घरात असे शब्द रचना करून त्यांना घरी आणि सुरक्षित राहण्याचे ही आपल्या गीतांमधून आव्हान केले आहे. प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी, सफाई कामगार जे कोरोना बरोबर लढत आहे यांचे कौतुक करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या चार वेगवेगळ्या गीतांमधून मनोबल वाढण्याचे काम लोककलावंत तथा गावरान मेवा वेब सिरीजचे अभिनेते दीपक शिंदे यांनी केलेले आहे. आज त्यांच्या या गीताची दखल मराठी चित्रपट सृष्टीतून अनेक गीतकारांनी घेऊन त्यांना व्हाट्सअप, फेसबुक द्वारे अभिनंदनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. दीपक शिंदे हे या कोरोनाव्हायरस या लढाईमध्ये रस्त्यावर जरी नसले परंतु जे रस्त्यावर येऊन ही लढाई लढत होते आणि आपलेच काही समाजबांधव नियमाचे पालन न करता विनाकारण रस्त्यावर येऊन प्रशासनास मदत करत नव्हते अशा ही लोकांना समज यावी म्हणून त्यांच्या गीतातून समाज प्रबोधनही केले. अशा या आष्टीचा लोककलावंत दीपक शिंदे यांचे आ. सुरेश धस, आ.बाळासाहेब आजबे, माजी आ. भीमराव धोंडे, समाजसेवक विजय गोल्हार, कासारी मुर्शदपुरचे सरपंच संतोष भैया चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे ,महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, पत्रकार दादासाहेब बन, गौतम डिसले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मित्र परिवार यांनी लोककलावंत दीपक शिंदे यांना व्हाट्सअप फेसबुक आणि फोन द्वारे शुभेच्छा दिलेल्या आहेत.








