शेतात दुध आणण्यासाठी गेलेल्या मुलीवर रानडुकराचा हल्ला

शेतात दुध आणण्यासाठी गेलेल्या मुलीवर रानडुकराचा हल्ला
गावंदरा शिवारात आठ दिवसांनंतर दुसरी घटना
धारुर प्रतिनिधि -इरफान शेख
शेजारच्या गोठ्यावरून दुध आणण्यासाठी जात असतांना स्वाती विठ्ठल बडे या मुलीच्या अंगावर अचानक धावत रानडुकराने हल्ला केल्याची घटना गावंदरा शिवारात शनिवारी सकाळी घडली . मुलीच्या मानेवर व तोंडावर गंभीर जखमा झाल्या आहेत .
मागील महीना भारापासून ग्रामिण भागात रानडुकराने हल्ला करून शेतकऱ्यास जखमी करण्याची संख्या वाढली आहे . कासारी बोडखा, भोगलवाडी तसेच आठ दिवसापुर्वी गावंदरा येथे शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केला होता . ही घटना ताजी असतानाच शनिवारी सकाळी स्वाती बडे ही मुलगी गावापासून काही अंतरावर असणाऱ्या गोठ्यावरून दुध आणण्यासाठी जात होती . या वेळी अचानक येवून रानडुकराने हल्ला केला . या वेळी मुलीजवळील स्कार्प अचानक रानडुकराच्या तोंडात अडकल्याने त्यास अधिक चावा घेता आला नाही . मुलीचा आरडाओरडा पाडून गोठ्यावरील ग्रामस्थांनी धाव घेतल्याने रानडुकराने पळ काढला .
रानडुकराच्या या हल्ल्यात मुलीच्या मानेवर व तोंडवर जखमा झाल्या आहेत . तिस भोगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामिण रुग्णालय धारूर येथे उपचार करून अंबाजोगाई स्वराती रुणालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे . रानडुकराच्या या सततच्या हल्ल्यामुळे ग्रामिण भागात शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.








