औरंगाबाद रेल्वे अपघात हा सरकारमधील समन्वयाच्या अभावाने; आम्हा राजकारण्यांना लाज वाटली पाहिजे- आ. सुरेश धस.

Ashti

औरंगाबाद रेल्वे अपघात हा सरकारमधील समन्वयाच्या अभावाने; आम्हा राजकारण्यांना लाज वाटली पाहिजे- आ. सुरेश धस.

आष्टी/प्रतिनिधी.
बीड प्रसार न्युज.

 परराज्यात जाणारे लोक पाकिस्तानी नाहीत. कोरोनामुळे किती जीव जातील हा संशोधनाचा विषय आहे. मात्र सरकारच्या समन्वयाच्या अभावाने कोरोनामुळेच माणसे आपला जीव गमावत आहेत हे दुर्देवी आहे, याला आमच्यासहीत सर्वच राजकारणी जबाबदार असून याचेच उदाहरण म्हणजे औरंगाबाद येथे रेल्वेखाली चिरडून मृत्यृमुखी पडलेले १६ नागरिक आहेत. कागदोपत्री घोडे नाचविण्यातच दिवस निघून जात असून प्रत्यक्षात कृती शुन्य असल्याचे टिकास्त्र आ.सुरेश धस यांनी सोडले.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच परराज्यातील नागरिकांना जाण्यासाठी ठरविलेले सरकारी धोरण म्हणजे कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार आहे. त्यामुळे राज्यातले राज्यात परतताना सुद्धा या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगत बसायचं. त्यातही आॅनलाईन असणारी यंञना कधी आॅफलाईन जाती याचा ताळमेळ नाही,'' असे सांगत हे नागरिक काय पाकिस्तानी आहेत की काय? असा सवाल उपस्थित करत आम्हा राजकारण्यांना काही लाज राहिली की नाही, असेही आ.धस म्हणाले.

Sharing

Visitor Counter