फळे, भाजीपाला थेट ग्राहकांना विकण्यासाठी शेतकरी व बचत गटांनी परवानगी काढावी.

Ashti

फळे, भाजीपाला थेट ग्राहकांना विकण्यासाठी शेतकरी व बचत गटांनी परवानगी काढावी
तालुका प्रशासनाच्या वतीने आवाहन.

आष्टी/प्रतिनिधी 
बीड प्रसार न्युज.
          
 कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. शेतकऱ्यांनी शेतात भाजीपाला व फळे पिकवलेली असून त्याची त्यांना विक्रीच्या अडचणी येतात, म्हणून शेतकरी, शेतकरी बचत गट व शेतकरी कंपन्या यांना शेतातील फळे व भाजीपाला थेट ग्राहकांना विकण्यासाठी परवानगी देण्याचे काम तालुकास्तरीय प्रशासनाकडून करण्यात येत आहे. शेतकरी व बचत गट यांच्यात समन्वय ठेवून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा व ग्राहकांना वाजवी दरात भाजी व फळे मिळावेत असा प्रयत्न प्रशासन करत आहे. तालुका स्तरीय समिती भाजीपाला व फळे यांचा दैनंदिन दर ठरवत आहे. परवानाधारक शेतकरी कंपन्या, शेतकरी गट किंवा विक्रेते यांनी शेतकऱ्यांकडून समितीने जाहीर केलेल्या दराच्या 60 टक्केपेक्षा कमी दराने फळे व भाजीपाला खरेदी करू नये अन्यथा सदर गट, कंपनी किंवा विक्रेते यांचा विक्री परवाना रद्द करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
           आष्टी तालुक्यातील फळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी स्वतः शेतातील भाजीपाला व फळे शेतकरी गटांमार्फत प्रशासनाकडून परवानगी घेऊन थेट ग्राहकांना बाजारपेठेत फिरून विक्री करावा. ज्या शेतकऱ्यांना स्वतः विक्री करणे शक्य नाही त्यांनी त्यांच्याकडे असलेला भाजीपाला व फळे  याची माहिती तात्काळ कृषी विभागाकडे नोंदवावी. जेणेकरुन विक्रेते व शेतकरी यांचा समन्वय घालणे शक्‍य होईल असे आवाहन नायब तहसीलदार शारदा दळवी व तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले आहे.

Sharing

Visitor Counter