मोबाईल रिचार्ज व रिपेअर दुकानाला परवानगी द्या-फयाज कुरैशी

मोबाईल रिचार्ज व रिपेअर दुकानाला परवानगी द्या-फयाज कुरैशी
बीड/प्रतिनिधि
राज्य शासनाने १७ मे रोजीपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात निर्गमित केलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सोमवार दि. ४ मे रोजी पहाटे जारी केलेल्या आदेशान्वये जिल्ह्यात काही उद्योगधंद्यांना सूट देण्यात आली आहे.
लॉकडाउनच्या या काळात गोरगरिबांचे हाल होतच आहेत परंतु अता किरकोळ व्यापार्यांचे देखील हाल होताना दिसत आहे त्यांना देखील अता काम केल्याशिवाय पर्याय नाही कारण ते कुनापशी मागु शकत नाही ना उपाशी राहु शकता याचा प्रशासनाने फेर विचार करावा.
मोबाईल रिचार्ज व मोबाईल चे दुकानदार हे किरकोळच व्यापारी आहेत.मोबाईल रिचार्ज, मोबाईल विक्रेते व रिपेअर करणारे दुकानदारंचे दुकान गेले ४३ दिवसा पासून सतत दुकान बंद असल्या मुळे यांच्यावर उपास मारीची वेळ आलेली दिसत आहे.
पहिलेच दीड दोन महिण्यापासून लॉकडाउन असल्यामुळे जनतेचे खुपच हाल होत आहेत जर मोबाईल दुकान बंद ठेवलेत तर यालोकांचे खुपच हाल होतील तरि विनंती करण्यात येते की गोरगरीब,कष्टकरी व्यापार्यांना परवानगी देण्याचा फेर विचार करून योग्य ते निर्णय घ्यावा.








