किराणा दुकाना विषयी घेण्यात आलेल्या निर्णयावर फेरविचार करण्यात यावा : हाजी सय्यद लायक

Beed

किराणा दुकाना विषयी घेण्यात आलेल्या निर्णयावर फेरविचार करण्यात यावा :  हाजी सय्यद लायक ( प्रदेशाध्यक्ष विश्व मानवाधिकार )

 बीड/प्रतिनिधी 
गेल्या पंधरा मार्चपासून  कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे भारतीय जनता आर्थिक रित्या मोठ्या संकटात सापडलेली असून 24 मार्च पासून देशात सर्वत्र लाॅकडाऊन व संचारबंदी आहे .अशा परिस्थितीत लोक आपापल्या कामावर नसून घरी बसून अडकून राहिलेले आहेत. आपल्या भारत देशाची अधिक तर लोकसंख्या हे दररोज काम करून आपला उदरनिर्वाह करणारी असून गेल्या दीड महिन्यापासून जनतेच्या हातावर काम नसल्यामुळे त्यांचे एक वेळेचे जीवनाचे भयानक प्रश्न निर्माण झालेले आहेत. अनेक सामाजिक संघटना या लोकांची मदत करत  असली तरी ती खूपच कमी व तुटपुंजी आहे. लोकांजवळ पैसे नाहीत अशा परिस्थितीत लोक कसेबसे दिवस घालीत आहेत .आज अधिकतर लोकसंख्या दररोज दहा पाच रुपयाचा लागणारा किराणा साहित्य कसेबसे व उधारी करून लोकांकडून उसने पैसे घेऊन आणीत आहे ,आता लोकांजवळ किराणा आणायला सुद्धा पैसे नाही अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी साहेब यांनी येणाऱ्या 10 मे 2020 पासून किराणा दुकान पूर्णपणे बंद करून किराणा सामान ॲप द्वारे खरेदी करण्याविषयी आदेशित केले आहे, यामुळे जनतेमध्ये बेचैनी निर्माण झालेली असून यामुळे जनतेचे मोठ्याप्रमाणावर हाल होणार आहे असे चित्र निर्माण होत आहे.
 सदर ची सक्ती न करता किराणा दुकाण दररोज  ठराविक तासांत करिता जनतेसाठी उघडे ठेवण्यात यावे व जनतेचे हाल होऊ नये.
कोरोना विषाणू वर नियंत्रण ठेवणाच्या प्रयत्न  करताना जनतेवर, गोर ,गरीब लोकांवर अन्याय होऊ नये याची दक्षता  घेणे गरजेचे आहे. म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांनी किराणा दुकाने बंद न करता दररोज ठराविक वेळेवर दुकाने सुरू ठेवण्या विषयी आदेशित करावे व लागू असलेले नियम दुकानदारांकडून  पाळण्यात यावे याविषयीचे  त्यांना सूचित करावे अशी मागणी विश्व मानवाधिकार परिषद (वर्ल्ड हुमन राइट्स कन्सिल) चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हाजी सय्यद लायक व प्रदेश सचिव  प्रा. सिराज खान आरजू यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे ईमेल द्वारे करण्यात आली आहे.

Sharing

Visitor Counter