कोरोनालस ग्रामपंचायत स्तरावर लोकसंख्येप्रमाणे गावागावात उपलब्ध करा- डॉ जितेंद्र ओव्हाळ

Beed

कोरोनालस ग्रामपंचायत स्तरावर लोकसंख्येप्रमाणे गावागावात उपलब्ध करा- डॉ जितेंद्र ओव्हाळ

आधारकार्ड, मतदानकार्डावर लस ध्या

किल्लेधारुर/प्रतिनीधी

जिल्ह्यात कोरोना लसीकरण चालू आहे अनेक ठिकाणी लोकांची गर्दी वाढत आहे लसीकरणावरुन जिल्हा रुग्णालयात झालेला लाठीचार्ज   लक्षात घेता ग्रामपंचायत स्तरावर लोकसंख्या नुसार गावागावात कोरोना लस उपलब्ध करण्याची मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी जिल्हा परिषदेचे सिइओ यांच्या कडे शनिवारी केली
        या बाबतीत डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी सांगितले कि कोरोना लस आज प्रत्येकाला आवश्यक आहे यासाठी लोक गर्दी करत आहेत या मुळे प्रशासनावर तान वाढत आहे तर लोकांना लसीकरणासाठी ताठकळत बसावे लागत आहे यातून होणारी गर्दी पुन्हा कोरोना संसर्ग वाढण्यासाठी कारणीभूत होत आहे तर नोंदणी मुळे अनेकांना आडचणी येत आहेत यासाठी आधार कार्ड, मतदान कार्डावर प्रत्येकाला ग्रामपंचायत स्तरावर  प्रत्येकाच्या गावात कोरोना लस देण्याची व्यवस्था सीइओ साहेबांनी निर्माण करून नोंदणी शिवाय लस ध्यावि आशि मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी शनिवारी धारुर येथील कोविड सेंटरच्या भेटी वेळी केली

Sharing

Visitor Counter