मनूर येथे दिव्यांग व्यक्ती व आवशयक त्याच ठिकाणी हामस्ट व पथ दिवा लावा—अविनाश ढगे

Beed

मनूर येथे दिव्यांग व्यक्ती व आवशयक त्याच ठिकाणी हामस्ट व पथ दिवा लावा—अविनाश ढगे

 माजलगाव/वार्ताहर 

 मौजे मनूर येथील अनेक वर्षापासून प्रलंबीत प्रश्न सौरपथ दिवा व हामस्ट लाईट संदर्भात तेथील सत्ताधारी आपण आपल्या मर्जी प्रमाणे रस्ते, नाले,सौरदिवे,व हायमस्ट लावतात,जे वंचीत शोषीत आहेत त्या ठीकाणी कसलीच सोयसूविधा नाही. तेथील ग्रामसेवक गेली दहा वर्षापासून गावचे सचिव आहेत मग प्रश्न पडतो की,गावचा  विकास कूठे आहे? सबंधितास वारंवार सांगून देखील दिव्यांग व्यक्तीच्या घरा समोर सौर अथवा हायमस्ट लावायला काय हरकत? श्री,विश्वाबंर पवार यांच्या घरी एकूण ४व्यक्ती अपंग असुन राञअपराञी त्या ठीकाणी अंधार असून तसेच संतोषी माता मंदिर परिसरात त्याही ठिकाणी अंधार असून आपण प्रकाश कधी आणणार? असा सवाल सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे. आम्ही प्रहार जनशक्तीच्या वतिने सबंधीत अधिकारी यांना निवेदन ही दिले आहे.जर ह्या  प्रशासनाने दोन ठिकाणी येत्या आठ दिवसात जर हामस्ट अथवा पथदिवे बसवले नाही तर प्रहार जनशक्ती पार्टी च्या वतिने तिव्र स्वरूपाचे अंदोलन करण्यात येईल  असा इशारा पक्षाचे युवक शहराध्यक्ष अविनाश ढगे यांनी गावचे ग्रामसेवक यांना दिला आहे.

Sharing

Visitor Counter