मुख्यमंत्री साहेब केंद्राला पाठवणा-या मराठा आरक्षणासोबत मुस्लिम आरक्षणाचे शिफारस प्रस्ताव पाठवा प्रा. इलियास इनामदार

मुख्यमंत्री साहेब केंद्राला पाठवणा-या मराठा आरक्षणासोबत मुस्लिम आरक्षणाचे शिफारस प्रस्ताव पाठवा प्रा. इलियास इनामदार
बीड/प्रतिनिधी
नुकतेच हल्ली सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द ठरवले राज्यामध्ये अनेक वर्षापासून मराठा-मुस्लिम आरक्षण आंदोलन सुरु आहे अनेकान्नी आरक्षणासाठी बलिदान दिलेले आहे कसे तरी मराठा आरक्षण मिळाले होते पण कोर्टात तेहि टिकले नाही शासनाकडून जसा पाठपुरावा करायचा त्या पद्धतीने करता आलेला नाही म्हणून शासनाचा या ठिकाणी मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती व लोकसेना संघटना निषेध करत आहे आणि जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षणाद्वारे न्याय मिळणार नाही तो पर्यंत राज्यातील मुस्लिम समाज मराठा समाजासोबत आंदोलनामध्ये सहभागी राहणार असे आश्वासन मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीने दिले आहे. व राज्य सरकार केंद्र सरकारला विनंती प्रस्ताव पाठवणार की केंद्र सरकरने केन्द्रात मराठा आरक्षण विषयी संसदेत कायदा करुन मंजूरी दयावी, म्हणून मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती व लोकसेना संघटना राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे साहेबांना विनंती करते की मराठा आरक्षण प्रस्तावा सोबत मुस्लिम आरक्षण लागू करण्याचे प्रस्ताव दयावे नस्ता मराठा आरक्षण आंदोलनासोबत मुस्लिम आरक्षण आंदोलन राज्यात पेठवणार असा इशारा प्रा. इलियास इनामदार यांनी दिला आहे आणि कांग्रेस-राष्ट्रवादीच्या मुस्लिम नेत्यांनी हुसेन दलवाई, नवाब मलिक, आरिफ़ नसीम खान, असलम शेख, हसन मुशरीफ, फ़ौज़िया खान, एम. एम. शेख, अनीस अहमद, बाबा सिद्दीखी, बाबाजानी दुर्रानी,सय्यद सलीम, सिराज देशमुख अब्दुल सत्तार यांनी आपापल्या पक्ष श्रेष्टींना व नेत्यांना मुस्लिम आरक्षण तात्काळ लागू करण्यासाठी दबाव टाकावे सत्ता नव्हती तेव्हा खुप थापा मारायचे अाता सत्ता तुमच्या पक्षाची आहे अाता कसली अडचन आहे शरद पवार व सोनिया गाँधी यांना आरक्षण देण्यासाठी सर्वांनी मिळून भाग पाडावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांना मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती व लोकसेना संघटनेने केलीली आहे.








