अवैध विक्री होत असलेली देशी दारू धारुर पोलिसांनी केली जप्त पोलीस प्रशासनाची धडक कार्यवाही

अवैध विक्री होत असलेली देशी दारू धारुर पोलिसांनी केली जप्त पोलीस प्रशासनाची धडक कार्यवाही
किल्ले धारूर/प्रतिनिधी
किल्ले धारूर तालुक्यातील गोपाळपूर येथे विनापरवाना दारू विक्री ची माहिती किल्ले धारूर पोलीस प्रशासनाला मिळताच धडक कार्यवाही करत आरोपी सहित ४५०० रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली.
धारूर तालुक्यातील गोपाळपूर येथे गेल्या काही दिवसापासून अवैध दारू विक्री सुरू आहे. धारूर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले गोपाळपूर गावात काही ठिकानी अवैध दारू विक्री केली जात आहे याच पार्श्वभूमीवर धारूर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सुरेखा धस,गुंड,चव्हाण यांनी आरोपी मधुकर सीताराम माळेकर यांच्या राहत्या घरातून २०० बाटल्या देशी दारू जप्त करण्यात या दारूची किंमत ४५००रुपये एवढी आहे.
सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक सुरेखा धस पोलीस हवालदार गुंड,मयूर टकले,चव्हाण यांनी केली.








