सुलेमान देवळा आरोग्य केंद्रात नियोजन पद्धतीने लसीकरण

Beed

सुलेमान देवळा आरोग्य केंद्रात नियोजन पद्धतीने लसीकरण

प्रतिनिधी/कवी प्रेम
   

सुलेमान देवळा आरोग्य केंद्रात एका आगळ्यावेगळ्या पद्धतीचे नियोजन करुन आरोग्य केंद्रात येणाऱ्या लोंकासाठी पाथरुम बाधुंन आणि सोशल डिस्टिंगचा वापर करुन लसीकरण घेण्यात आले असुन डॉ. नितीन राऊत व त्यांचे सर्व कर्मचारी यांनी हा उपक्रम राबला तसेच सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके यांनी या लसीकरणात जातीने लक्ष देऊन ते स्वतः आरोग्य केंद्रात पहाटेपासूनच कार्यरत होते त्यांच्या या कार्यासोबत संपूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांचे तोंडभरून पंचक्रोशीतुन आज कौतुक होतं आहे येवढा सारा उपक्रम राबुन सुद्धा काही जण बिना लक्ष घेता वापस गेले कारण शासनाकडुन होणार लसीचा पुरवठा हा अल्पसंख्याक असुन लस घेणाऱ्याची संख्या ती वाढतं आहे आणि आता कुठे जनता ही लसीबाबत जागी झाली असुन लसीकरणासाठी हजारोंने संख्या वाढत आहे तरी शासनाने प्रत्येक आरोग्य केंद्रास लसीचा पुरवठा जास्त करावा हिच सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके यांनी शासनाकडे मागणी केली तसेच जास्तीत जास्त लोंकानी या लसीकरणाचा फायदा घ्यावा आणि लस ही शांततेत रांगेत उभे राहुन आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे डॉ. नितीन राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Sharing

Visitor Counter