लसीकरण केंद्रा बाहेर मंडप उभारण्यात यावे युवक काँग्रेसचे ॲड.श्रीनिवास बेदरे यांची मुख्यमंत्री कडे मागणी
Beed

लसीकरण केंद्रा बाहेर मंडप उभारण्यात यावे युवक काँग्रेसचे ॲड.श्रीनिवास बेदरे यांची मुख्यमंत्री कडे मागणी
गेवराई/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील नागरीकांची लस घेण्यासाठी झुंबड उडालेली आहे, तासंतास त्यांना रांगेत उभा राहावं लागत आहे. या मध्ये वयोवृद्ध नागरिकांचा देखील समावेश आहे. सध्याचे उन्हाचे तापमान पाहता रांगे मध्ये उभा राहून नागरिकांचे हाल होताना दिसून येत आहेत.
यामुळे त्यांच्या जीवाला धोका उदभवू शकतो.आपणास नम्र विनंती करतो की आपण या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्वरित लस घेणाऱ्या वयोवृद्धांना सावलीची व्यवस्था करताल व या निवेदनाची दखल घेऊन अंमलबजावणी कराल अशी अपेक्षा बाळगतो, असे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात बीड जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्रीनिवास बेदरे यांनी म्हटले आहे.
