कर्तव्य बजावत असताना खाजगी डॉक्टराणा त्रास द्याल तर याद राखा-डॉक्टर जितीनदादा वंजारे

कर्तव्य बजावत असताना खाजगी डॉक्टराणा त्रास द्याल तर याद राखा-डॉक्टर जितीनदादा वंजारे
बीड/प्रतिनिधी
सध्या कोवीडच्या काळात सख्खे पण परके झाले असताना अक्षरशः जीवावर बेतुन कसलीच तमा न बाळगता अगदी निस्वार्थ सेवा देणाऱ्या माझ्या तमाम होमीओपॅथीक डॉक्टराणा संबंधित गावकर्यांनी ,गावातील सरपंच,उपसरपंच,सदस्य तसेच ग्रामसेवक आणी सामाजिक कार्यकर्त्यांनी योग्य ते सहकार्य करावे.डॉक्टराणा स्वतःचा प्रपंच असताना पोटच्या मुलाबाळाची ,कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देतात.कोवीड काळात कोणी कोणाला शिवत पण नाही अश्या भयानक काळात विश्वासाने सेवा देतात.आणी याच शांत स्वभावाच्या डॉक्टराणा हाकनाक कोणी गावातील पेताड मंडळी त्रास देत असेल तर हा गंभीर गुन्हा आहे.याची कारण मिमांसा करून गावातील जेष्ठ मंडळी,सामाजिक कार्यकर्ते ,ग्रामपंचायत कार्यकर्ते ,ग्रामसेवक, तलाठी यांनी योग्य लक्ष घालून त्या संबंधित गुन्हेगारावर योग्य कार्यवाही करावी असे आव्हाहन होमीओपॅथीक डॉक्टर संघटनेचे बीड जिल्हा महासचिव डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले आहे.
योग्य सेवा देऊनही त्याची पोचपावती एका पेताडाची उर्मट भाषा आणी त्याचा अडाणी सल्ला विनाकारण चा त्रास असेल तर तो सरासर अन्याय आहे आणी असा अन्याय माझ्या डॉक्टर बांधवावर होऊ देणार नाही.जर प्रशासनाणे योग्य वेळी कार्यवाही केली नाही आणी यातून माझ्या एखाद्या डॉक्टर मित्राला हानमार,दमदाटी किंवा शिवीगाळ झालीच तर वेळ प्रसंगी कठोर निर्णय घेऊन आरोग्य यंत्रणा बंद करू असा इशारा हिमा डॉक्टर संघटनेचे जिल्हा महासचिव डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला..
कर्तव्य बजावन्यासाठी जातं असणाऱ्या डॉक्टर बांधवाना पोलिसांकडून मारहाण होण हे नैतिक महाराष्ट्राला कदापीही मान्य नसणार आहे.त्यामुळे माझ्या तमाम पोलीस बांधवाना नम्र विनंती आहे की त्यांनी सहकार्य करा.आपले कोवीड काळातले योगदान हे अतिशय मोलाचे आहे पण आपण डॉक्टराणा मारहाण करणे हे योग्य नाही.पोलीस ,डॉक्टर व इतर मेडिकल स्टाफ ,सामाजिक, कार्यकर्ते इत्यादी सर्वच लोक हे देवदूता सारखी काम करतात त्यांना कृपया समाजातील कोणीही त्रास देता कामा नये .पोलिसांनी सहकार्य करावे असे नम्र आव्हाहन यावेळी हिमा डॉक्टर संघटनेचे जिल्हामहासचिव डॉक्टर जितीनदादा वंजारे यांनी केले.








