लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे यांचे निधन

Beed

लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे यांचे निधन 

बीड/वार्ताहर 

 लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ रामा कांबळे ( वय ३८ ) यांचे दि .४ रोजी सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू असताना दुःखद निधन झाले . तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील सामाजिक कार्यकर्ते लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे हे काही दिवसांपासून आजरी होते . त्यांच्यावर सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालु होते . पण नियतीने घात केला आणि दि .४ रोजी संध्याकाळच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली . त्यांच्या पश्चात आई , पत्नी , दोन मुले , एक भावजय , दोन पुतणे असा परिवार आहे.काटगाव च्या विद्यम न सरपंच नगिनाताई सोमनाथ कांबळे यांचे ते पती होते.गेल्या चार दिवसापूर्वी त्यांचे सख्खे भाऊनवनाथ रामा कांबळे यांचेही अल्प आजाराने निधन झाले आहे . एकाच आठवड्यात घरातील दोन कर्ते पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे . आपल्या सामाजिक कार्याची सुरवात त्यांनी सन २००४ पासून लहुजी शक्ती सेनेच्या म ध्यमातून केली होती.उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष , मराठवाडा प्रमुख ते सध्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावरते कार्यरत होते.महाराष्ट्र राज्यसह आंध्रप्रदेश , कर्नाटक सह आदी राज्यात त्यांनी लहुजी शक्ती सेनेचा विस्तार केला होता . मातंग समाजाला न्याय देणे , अन्ययाच्या विरुद्ध आक्रमक लढा देऊन गरीब आणि असंघटित बहुजन समाजाला लढा देण्यासाठी ते सतत धैर्याने लढत होते . प्रस्थापितांना धडकी भरेल असेल नेतृत्व आगेकूच करत होते.मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी तहसील कार्यालय ते मंत्रालयापर्यंत अनेक आंदोलने केली आहेत . आपल्या दिलदार स्वभावामुळे ते एक कुशल संघटक होते . त्यांच्या पार्थिवावर काटगाव येथे अंत्यसंकार करण्यात आले.त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबियांवर व मातंग समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या निधनाने गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे .

Sharing

Visitor Counter