इफ्तारच्या वेळेस नागरीकांना होणारी मारहाण थांबवून रमजाननिमित्त रोज सांयकाळी लॉकडाऊनमधून सूट द्या - हाफिज अशफाक

इफ्तारच्या वेळेस नागरीकांना
होणारी मारहाण थांबवून रमजाननिमित्त रोज सांयकाळी लॉकडाऊनमधून सूट द्या - हाफिज अशफाक
बीड/प्रतिनिधी
शहरातील मुस्लिम बहुल भागांमध्ये दररोज इफ्तारच्या वेळेत घरासमोर असलेल्या नागरीकांना पोलिसांकडून मारहाण केली जात आहे. त्याचा प्रचंड त्रास होऊ लागला आहे. यासंदर्भात मा. जिल्हाधिकारी साहेब, मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी दखल घ्यावी आणि ही मारहाण थांबवावी. त्याचबरोबर रमजान महिन्यानिमित्त दररोज संध्याकाळी 5 ते 6.30 या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सूट द्यावी अशी मागणी हाफिज अश्फाक यांनी केली आहे.
बीड येथील मोमीनपुरा भागातील हाफिज अश्फाक यांनी निवेदनात म्हटले आहे की, सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. संध्याकाळच्या वेळेत काही भागात फ्रुटचे किंवा पेंड खजूरचे गाडे विक्रीसाठी येतात. त्यासाठी नागरिक घरासमोर येतात मात्र त्याचवेळी पोलिसांकडून मारहाण केली जात. मोठी जखम होईपर्यंत मारहाण होत आहे. यामध्ये काही राजकिय लोक जाणीवपूर्वक सामन्य लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जुने राजकिय वाद बाहेर काढूनही त्रास दिला जात आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून असे प्रकार थांबवावेत अशी मागणी हाफिज अश्फाक यांनी केली आहे. सध्या रमजान महिना सुरू असल्याने लॉकडाऊनच्या वेळेत बदल करून संध्याकाळी 5 ते 6.30 पर्यंत सवलत द्यावी. ज्यामुळे सर्वांची सोय होईल ही विनंती हाफिज अश्फाक यांनी केली आहे.








