कोरोनाचा कहर त्यात,डिवायएसपी च्या अत्याचाराची भर !

कोरोनाचा कहर त्यात,डिवायएसपी च्या अत्याचाराची भर !
कोरोना आणि डिवायएसपीत चुरस एक मरतो एक झोडपतो !
बीड/वार्ताहर
बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दि .५ ते ७ मे या तीन दिवसाच्या कालावधीत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे .या अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना तीन दिवस क्षमतेने बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या परंतु डीवायएसपी व त्यांच्या कर्मचाऱ्यांना याचा विसर पडला की काय ? असा प्रश्न याठीकाणी निर्माण होत आहे कारण काल बुधवार दि.5 रोजी संध्याकाळी आष्टी तालुक्यातील टाकळसिंग पीएचसीचे डॉ.विशाल वनवे यांना च-हाटा फाटा बीड येथे पोलिसांकडून कसलीच चौकशी न करता,ओळखपञ दाखवूनही पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे तर बीड जिल्हा रुग्णालयातील देखील लसीकरणासाठी रांगेत उभे असणाऱ्या युवकांमध्ये मतभेद वरून देखील बेदम मारहाण करण्यात आली आहे.तसेच सकाळी शहरातील औषधी दुकानावर देखील दोन कर्मचाऱ्यांना डीवायएसपी व त्यांचे कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे.या घटनेमुळे जोपर्यंत मुजोर पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत तालुका अधिकारी डॉ.नितीन मोरे यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आज दिनांक ५/५/२०२१ रोजी सायंकाळी डॉ.विशाल बनवे वैद्यकीय अधिकारी ( गट अ ) प्रा.आ.केंद्र टाकळसिंग यांना चऱ्हाटा फाटा बीड येथे पोलीसांकडुन मारहाण करण्यात आली . ओळखपत्र दाखविले असता पोलीसांनी दखल घेतली नाही . या घटनेचा आष्टी तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीव्र निषेध केला असुन जो पर्यंत संबंधीत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेवर कायदेशीर कार्यवाही होत नाही तो पर्यंत आष्टी तालुक्यातील सर्व प्रा.आ.केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी कामबंद आंदोलन करत असुन उद्याचे कोव्हिड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण होणार नसल्याचे सांगीतले आहे .








