तिरुपती कन्ट्रक्शन चा मुजोर पणा कायम, मुस्लिम स्मशानभूमीतील कबरी तील मानवी देहाची विटंबना

तिरुपती कन्ट्रक्शन चा मुजोर पणा कायम, मुस्लिम स्मशानभूमीतील कबरी तील मानवी देहाची विटंबना
गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना तक्रार -- डॉक्टर गणेश ढवळे
बीड ( रिपोर्टर - गोरख मोरे ) :
पाटोदा शहरातून जात असलेल्या पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गाचे, काम सुद्धा पाटोदा शहरातून चालू आहे, या कामात अंतर्गत शहरातील मध्यभागी असलेल्या, राज मोहम्मद चौकातील मुस्लिम स्मशानभूमीचे, संरक्षक भिंती तोडण्यात आली होती, या संरक्षण भिंतीच्या 56 असलेल्या कबरी बुजवून न घेता, तिरुपती कन्ट्रक्शन ने त्या उघड्या सोडून दिल्यामुळे, त्या कबरी तील मृतदेहांचे अवशेष बाहेर आलेले आहेत, तसेच त्या अवशेषांचे कुत्रे लचके तोडत असल्याचे दिसून येत आहे, यामुळे मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीचे तिरुपती कंट्रक्शन कडून, विटंबना होत आहे, या बाबतीत शासनाने तिरुपती कंपनीच्या मालका विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी पत्रकार व समाजसेवकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. पाटोदा शहरातील राज मोहम्मद चौक येथे, मुस्लिम समाजाची जुनी स्मशान भूमी आहे, या स्मशानभूमी ला दगडी चिरे चे बांधकाम होते, परंतु या रस्त्याच्या कामाच्या वेळेस, ही संरक्षक भिंत पाडण्यात आली होती, परंतु हे रस्त्याचे काम मागील दोन वर्षापासून रखडले आहे, त्यामुळे उघड्या होत चालल्या कपारीतील मृतदेहांचे अवशेष उघडे पडले आहेत, त्यामुळे वरील प्रकरणात तिरुपती कन्ट्रक्शन ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी तक्रार डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड, आमिर खान युसुफ खान पठाण, शेख जावेद शेख रज्जाक, शेख जिलानी शेख बशीर, शेख महेश्वर, शेख ताहेर यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक बीड, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी नगरपंचायत पाटोदा यांना केली आहे .
पालक मंत्री धनंजय मुंढे यांच्या वरदहस्तामुळे तिरुपती कन्ट्रक्शन चा मुजोरपणा वाढला -- डॉक्टर ढवळे
पैठण -- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटोदा शहरातील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व अंदाज पत्रकाप्रमाणे होत नसून याविषयी वारंवार सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार यांनी लेखी तक्रारी नंतर दैनिकातून बातम्या प्रसिद्धी होऊन सुद्धा केवळ पालक मंत्री धनंजय मुंढे यांच्या कार्यकर्त्यांचे तिरुपती कंट्रक्शन ठेकेदार असल्यामुळेच कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने मुजोरपणा वाढला आहे .








